परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीचे दिशादर्शक सूत्रे

 

 (zoom in zoom out for better experiance)

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीचे दिशादर्शक सूत्रे


   
 
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथालयातील घोषवाक्य--
     "(१) शब्दात शहाणपण,
             विचारात निष्ठा,
             वर्तनात चारित्र्य
             असेल तर भारत महान बनू शकेल.
    
       (२) तुला जर मनुष्य बनावयाचे असेल तर,
             स्वतःच स्वतःशी कठोर शिस्तीने वागले पाहिजे.

       (३) सत्य हे सत्य म्हणूनच ओळखा,
             असत्य हे असत्य म्हणूनच ओळखा.
 
       (४) धर्म मनुष्या करता आहे,
              मनुष्य धर्माकरता नाही."

    
 
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ग्रंथात उद्धृत केलेल्या 
 मूळ इंग्रजी वचनांचे मराठी भाषांतर--
   
     (१) तुम्ही किती अंतर तोडून पुढे गेला हे कमी महत्वाचे आहे.
             तुम्ही अचूक दिशेने गेला काय ? हे अधिक महत्त्वाचे आहे.
 --टॉलस्टाय
     
     (२) तुम्ही आमचे मालक बनावे हे तुमच्या हिताचे असेल,
परंतु आम्ही तुमचे गुलाम बनावे हे आमच्या हिताचे कसे होऊ शकेल 
  --थुसिडायस

     (३) जो कोणी युक्तिवाद करीत नाही, तो केवळ हट्टी आहे.
जो कोणी युक्तिवाद करू शकत नाही, तो मुर्ख आहे.
जो कोणी युक्तिवाद करण्याचे धैर्य करीत नाही, तो गुलाम आहे
 --ड्रमंड 


 
 
amazon laptops Click here

Comments