Babasaheb Ambedkar Speeches_for womens - 20 july 1942


     


महत्वाचे संदेश - Part 2

               
 ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लाससेस वूमेन्स कॉन्फरन्स चे दुसरे सत्र २० जुलै १९४२ रोजी सकाळी १० वाजता नागपूरला मोहन पार्क मधे त्यासाठी खास उभारलेल्या भव्य शामियाण्यात सुरू झाले. सुमारे ७५,००० श्रोते उपस्थित होते. स्त्री प्रतीनिधींची आणि निमंत्रितांची संख्या २५,००० च्या आस पास होती. व्यासपीठावर डॉ. आंबेडकरांच्या जोडीला इतर मान्यवर नेते ही बसले होते. स्वागत समितीच्या अध्यक्षाने डॉ. आंबेडकरांना मानपत्र अर्पण केले. परिषदेपुढे भाषण देताना डॉ. आंबेडकर म्हणाले :
     Image result for babasaheb ambedkar giving speech
     “आपल्या समोर या प्रसंगी बोलताना मला अत्यंत आनंद होत आहे. बहिष्कृत वर्गाच्या विकासात रस असणार्‍या कोणालाही स्त्रियांची एवढी उपस्थिती पाहणे यापेक्षा अधिक मोठा आनंदाचा क्षण संभवत नाही. तुम्ही एवढ्या मोठ्या जवळपास वीस- पंचवीस हजाराच्या संख्येने एकत्र जमावे हे दहा वर्षा पूर्वी कल्पनेतही शक्य वाटले नसते. स्त्रियांच्या संघटनावर माझा ठाम विश्वास आहे. त्यांची एकदा खात्री पटल्यावर त्या समाजाची परिस्थिति सुधारण्या साठी काय करू शकतात याची माला जाणीव आहे. सामाजिक आरीश्तांच्या निरकरणात त्यांनी महान कामगिरी केलेली आहे. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून त्याची साक्ष देवू शकेन. बहिष्कृत समाजात जेव्हा पासून मी काम सुरू केले तेव्हा पासून पुरुषा बरोबरच स्त्रियांनाही घेवून चालण्यावर मी कटाक्ष ठेवला. त्यामुळेच आपल्या परिषदा नेहमी समिश्र असतात हे तुमच्या लक्ष्यात आलेच असेल. कोणत्याही समाजाच्या प्रगतिचे मोजमाप मी त्या समाजातील स्त्रियांनी संपादीत केलेल्या प्रगतिच्या प्रमाणावरून करतो आणि असा मेळावा पाहिल्यावर माझी खात्री पटते आणि मला आनंदही होतो की आम्ही निश्चितपणे प्रगति केली आहे. तुम्ही लक्ष्यात ठेवाव्यात आशा काही गोष्टी मी आता तुम्हाला सांगतो." 
             Image result for babasaheb ambedkar giving speech
    " स्वच्छ राहायला शिका; सर्व दुर्गुणापासून दूर रहा. तुमच्या मुलांना शिकवा त्यांच्यात महत्वाकांक्षा निर्माण करा. ते महान होण्यासाठीच जन्माला आले आहेत अशी भावना त्यांच्या ठिकाणी जोपासा. त्यांचे सर्व प्रकारचे न्युनगंड निपटून काढा. लग्नाची घाई करू नका. लग्न म्हणजे जोखीम असते. लग्नामुळे अंगावर येणार्‍या जबाबदारया पार पाडण्याची आर्थिक कुवत आल्याशिवाय तुम्ही ती जोखीम त्यांच्यावर लादू नका. ज्यांची लग्ने होतील त्यांनी हे ध्यानात ठेवावे फार संतती निर्माण करणे हा गुन्हा आहे. आपल्याला मिळाल्या नाहीत त्या संधि पाल्यांना उपलब्ध करून देणे हेच पालकांचे कर्तव्य असते. जिचे लग्न करायचे ती प्रत्येक मुलगी नवर्‍याच्या बरोबरीने वावरू शकली पाहिजे, तिने स्वत:ला आपल्या नवर्‍याची मित्र आणि बरोबरी समजली पाहिजे आणि त्याची गुलाम होण्यास ती स्पष्ट नकार देवू शकली पाहिजे. तुम्ही जर हा उपदेश आचरणात आणला तर माला खात्री आहे की तुम्ही स्वत:चा तसेच बहिष्कृत वर्गाचाही सन्मान आणि लौकिक वाढवाल."


  प्रस्तुत भाषण संदर्भ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी 
- नानक चन्द रत्तु
buy this book click here
 

Comments