विद्या
संपादन करण्यासाठी खडतर तपश्चर्या ही केवळ आयुष्याचे ध्येय गाठण्यासाठी
पूर्व तयारी होती. पोटासाठी हायकोर्टात वकिली करून उरलेला वेळ अस्पृश्य
समाजाच्या जागृती आणि संघटना साठी खर्च करकरण्याचा बाबासाहेबांचा निर्धार
होता.
समाज जागृतीसाठी वर्तमानपत्रासारखे प्रभावी साधन नाही. अस्पृश्य समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणारे 'मूकनायक' नावाचे पाक्षिक त्यांनी सुरू केले. या पाक्षिकासाठी शाहू महाराजांनी आर्थिक सहाय्य केले. 'मूकनायक' ची बिरूदावली म्हणून त्यांनी शिरोभागी तुकारामांचा अभंग छापला :
"काय करू आता धरूनिया भीड
निःशंक हे तोंड वाजवीले
नव्हे जगी कोणी मुकीयाचा जाण
सार्थक लाजून नव्हे हीत."

Buy the Fountainhead book by any rand in marathi
पहिल्याच अंकात या वृत्तपत्राचा उद्देश स्पष्ट करताना बाबासाहेब लिहितात, "हिंदुस्तान देश केवळ विषमतेचे माहेर घर आहे. यात एक एक जात म्हणजे एक एक मजला आहे. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातील इसम कितीही लायक असला, तरी त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही. वरच्या मजल्यावरचा माणूस कितीही नालायक असला तरीही त्याला खाली लोटून देण्याची कुणाची हिंमत नाही. युगानुयुगे चालत आलेले दास्य, दारिद्र्य यांपासून बहिष्कृत वर्गाची मुक्तता करण्यासाठी आकाश पाताळ एक केले पाहिजे. त्यांच्या डोळ्यात ज्ञानाचे अंजन घालून त्यांना आपल्या हीन परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे." या भाषेवरून बाबासाहेबांच्यातील निर्भिड आणि अस्पृश्योद्धाराची तळमळ या दोन्ही गोष्टी जाणवतात.

Buy Anihilation of caste by Dr. Babasaheb Ambedkar clik here |
Comments
Post a Comment