बाबासाहेब म्हणतात...


              "जर तुमच्याकडे 2 रुपये असती  एका रुपयाची भाकरी घ्या  एका रुपयाचे पुस्तक घ्या
                    भाकरी तुम्हाला जगवेल आणि   पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल."

                                                 "शिक्षण विद्या याशिवाय आपला उद्धार होणार नाही.
                                 तुम्ही भरपुर वाचन केले पाहिजे. 
                               रोज एक अर्धे पुस्तक वाचले पाहिजे."
                                     - डॉ. बाबासाहेब आंबेडकर (M.A., Ph.D., M.Sc., D.Sc., Bar-at-law, LLD, D.Lit.)


       14 एप्रिल ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. हा दिवस "जागतिक ज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो. हे आपल्या पैकी किती जणांना माहीत आहे खूप कमी लोकांना हे माहीत आहे. आपण कधी विचार केलात, कोलंबिया विद्यापीठाने 14 एप्रिल या दिवसाला "जागतिक ज्ञान दिवस" म्हणून घोषित करण्याचं कारण काय असेल ? कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असतांना बाबासाहेब 21-21 तास अभ्यास करायचे. त्यांच्या साठी शिक्षण म्हणजे अत्यंत मौल्यवान गोष्ट होती. तसेच लंडनमध्ये  Bar-at-Law चा अभ्यास करताना, ग्रंथालय सुरू होण्या आधी पाच मिनिटे बाबासाहेब ग्रंथालयात हजर असायचे ग्रंथालय बंद होण्याच्या वेळी सेवकाबरोबरच बाहेर पडायचे. दिवसभर पोटात जेवण नसलं तरी त्यांचे खिसे मात्र अभ्यासाच्या टिप्पणांनी फुगलेले असायचे.



       "शिक्षणा शिवाय मनुष्याचा विकास नाही आणि  विकासाशिवाय या मनुष्य जीवनाला अर्थ नाही." 

       असं बाबासाहेब म्हणायचे. बाबासाहेबांचं पुस्तक प्रेम हे प्रचंड होतं. आणि या पुस्तक प्रेमा पोटीच पुस्तकासाठी घर "राजगृह" बांधणारे बाबासाहेब हे एकमेव आहेत.  पुस्तकं ही घराला खर्या अर्थाने समृद्ध करतात. आणि त्या सोबतच पुस्तकं आपल्या जीवनाला सुद्धा समृद्ध करतात. आपण घर बांधतो, नवीन गाडी घेतो, नवे- नवे कपडे घेतो, दागिने घेतो, भारीचे मोबाइल फोन घेतो, पण
आपण कधी एखादे पुस्तक विकत घेतो का



              "मंदिरात जाणार्या लांब रांगा, ज्या दिवशी वाचनालायकडे वळतील. 
         त्या दिवशी माझ्या देशाला महासत्ता  होण्या पासून कोणीच थांबवू शकणार नाही."
                                                                                                    - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

        बाबासाहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य आपल्या समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी वेचलं. आणि आपल्या सर्वांना शिक्षण घेवून ज्ञानी व्हायला सांगितलं. आपण त्यांचे फोटो बघतो ! पुतळे बघतो ! या सर्वांमध्ये एक समान गोष्ट काय आहे ? बाबासाहेबांच्या हातांमध्ये पुस्तकं आहेत. कारण त्यांनी आजन्म पुस्तकं वाचली आहेत. ते आजन्म विद्यार्थी राहिले, आणि आजन्म ज्ञानार्जन करत राहिले. त्यांच्या भाषणा मधून , लिखाणा मधून आपल्याला सुद्धा वाचनाचा आदेश दिलाय. आपण कधी तो लक्ष्यात घेतला आहे का ? ज्या बाबासाहेबांच्या नावे आपण भीम जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो. परंतु तेवढ्याच उत्साहाने कधी पुस्तक घेवून वाचन केले तर


             "कोणत्याही सामाजाची उन्नती ही त्या समाजाच्या प्रगती वर अवलंबून असते."
                               
                            - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

        या देशातील प्रत्येकाने शिक्षित झालेच पाहिजे असा बाबासाहेबांनी आग्रह धरला. शिक्षणाकडे पाहण्याचा बाबासाहेबांचा दृष्टिकोन हा विधायक आणि रचनात्मक होता. बाबासाहेबांनी शिक्षणाची व्याख्या अश्या प्रकारे केली, "व्यक्तीला जाणीव देते, ते शिक्षण." ज्या  समाजाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणिव नव्हती, त्या संवेदनाहीन आणि मृतवत झालेल्या समाजात, वैचारिक क्रांती द्वारे जीवन चैतन्य आणि अस्तित्वाची जाणीव निर्माण करण्याचे काम बाबासाहेबांनी केले. आपल्या अस्तित्वाची सुरुवातंच बाबासाहेबां पासून होते. 

       या भीम जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांचा आदेश आपल्या पर्यन्त पोहचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. या निमित्ताने पुस्तक रूपात घरा घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोहचवण्याचा उपक्रम आम्ही करत आहोत. 

                                                   


    
कारण बाबासाहेब म्हणतात.


                                 " एखाद्या वनस्पतीला पाणी देण्याची जितकी गरज आहे
                 तितकीच एखाद्या कल्पनेला प्रसाराची आवश्यकता आहे."

                                                   - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
                                        (M.A., Ph.D., M.Sc., D.Sc., Bar-at-law, LLD, D.Lit.)


       आपण नक्कीच बाबासाहबांचे आदेश आपल्या आयुष्यात उतरवून, पुस्तकांचे वाचन करण्याचा संकल्प कराल बाबासाहेबांचे विचार घरा घरात पोहचवण्यासाठी हातभार लावणे. हीच आपली बाबासाहेबांच्या चरणी खरी आदरांजली असेल. 



                 आपणा सर्वांना 131 व्या भीम जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा.
         
            

                            जय भीम !! जय भारत !!
         
                                       

                                                                                      - Daughter of Dr. B. R. Ambedkar  

 

Comments