बाबासाहेबांचा सामाजिक कार्यकाळ (१९२० ते १९३०) भाग पहिला




डॉ. बाबासाहेबांची सामाजिक कार्यास सुरुवात :

> ३१ जानेवारी १९२० : 'मूकनायक'  साप्ताहिक सुरू केले.

> २१ मार्च १९२० : माणगाव (कोल्हापूर संस्थान) येथे पहिले जाहीर भाषण व शाहूमहाराजांची भेट.

> मे १९२० : नागपूर येथील अस्पृश्य परिषदेत  'अस्पृश्योद्धार' या प्रश्नावर भाषण.

> जुलै १९२० मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना. (डी. एस् सी. व बार-अॅट-लॉं)

> १९२३ मध्ये उच्च अभ्यास यशस्वी रीतीने पूर्ण करून भारतात परत.

संघटनात्मक पद्धतीने सामाजिक कार्यास सुरुवात :

> ९ मार्च १९२४ रोजी संघटनात्मक पद्धतीने सामाजिक कार्य सुरू करण्यासाठी कार्यकर्त्यांची मुंबईत पहिली बैठक घेतली.

> २० जुलै १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' या नावांची संस्था स्थापून ती रजिस्टर केली. तिचे कार्य मुंबई प्रांतापुरते मर्यादित होते. ऑफिस मुंबईत असे.

> ४ जानेवारी १९२५ रोजी या संस्थेने सोलापूर येथे 'विद्यार्थी वसतिगृह' सुरू केले.

> १९२५ वैशाखी पौर्णिमेला 'जेजुरी', जि. पुणे, येथे मोठी सभा घेवून अस्पृश्य समाजाला स्वउद्धाराचा मार्ग दाखविला.

> १० - ११ एप्रिल १९२५ : 'बहिष्कृत भारत' साप्ताहिक सुरू.

सामुदायिक सत्याग्रह :

> १९ - २० मार्च १९२७ : कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद : महाड येथील चवदार तळ्यावर पाणी भरण्याचा सत्याग्रह.

> १३ नोव्हेंबर १९२७ : नाशिक जिल्हा महार वतनदार परिषद.

> २४ - २५ डिसेंबर १९२७ : महाड येथे पुन्हा सत्याग्रहाची तयारी. मनुस्मृतीचे दहन.

> १९ मार्च १९२८ रोजी महार वतन नष्ट करणारे बिल कौन्सिलमध्ये दाखल केले.

> २३ ऑक्टोबर १९२८ रोजी सायमन कमिशनपुढे साक्ष व एक स्वतंत्र खलिताही दाखल.

मंदिरप्रवेश सत्याग्रह :

> २ मार्च १९३० : नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.





Comments