एक कर्मचारी येतो, काम करतो..घरी जातो..कपडे मळत नाही..शरीर थकत नाही..कमाई.. १०००-३००० रुपये एक दिवसाची
एक मजूर येतो..कष्ट करतो..घाम गाळतो..अंग मेहनत करतो..दमतो..घरी जातो..कमाई ३०० रुपये एक दिवसाची
*हे असं का...???
तुमच्या सदसादविवेक बुद्धीची दारे उघडी करा...
आणि चला...आत जाऊया...
**शासकीय कर्मचार्याला सरकार इतकी पगार का देते...?? जे की मूळात काम खूप कमी असते पन पगार खूप जास्त..??
कारण, ही पगार फक्त त्या कर्मचार्याला नसून कर्मचार्याच्या संपूर्ण कुटुंबाला असते !
सर्व प्रथम कर्मचार्याचे आई वडील..कुटुंब आणि मुलं बाळं !
जेव्हा
एक कर्मचारी त्यांच्या साठी काम करतो तेव्हा इतक्या सर्वांची जबाबदारी
शासन घेतं..तो रुजू झाल्या पासून च हे सुरू होतं. तो कर्मचारी सरकार ची
जबाबदारी असतो म्हणून त्याचा सर्व सांभाळ हा सरकार करते. ही एक पारंपारिक
पद्धत आहे. पूर्वी राजा च्या दरबारी जे काम करत तेव्हा त्यांच्या सर्व
कुळाची जबाबदारी घेतली जात. तेच स्वरूप आज ही लागू आहे. बस ‘जन्माने येणारी
जागा’ येवढा नियम बदललाय.
शिवाय जे अपत्य जन्माला येतं त्याच्यावर
आपल्या देशाची काही जबाबदारी असते. त्यामुळे सरकार लहान मुलांचे भविष्य
घडवायला कटिबद्धं असतं. जेणे करून ते बालक देशासाठी सुद्धा काही करेल.
बरोबरच देशात असणारी गरीबी घालवून देशातील गरीब-मजूर-दुबळ्या लोकांना पण
वरती आणेल हा उद्देश असतो.
**त्यात आपण बघतो की, शिक्षकांना आणि प्राध्यापकांना इतका पगार का ?
याचे ही उत्तर सरळ आहे. हे लोक आपले मुलं लहान असतात तेव्हा पासून घरी
सोडून देशाचे भविष्य असनारे मुलं सांभाळतात. म्हणून देश आणि सरकार शिक्षक
आणि प्राध्यापकांच्या मुलांना काही कमी पडू नये तसेच त्यांनी उच्च शिक्षण
घ्यावं यासाठी आग्रही असते आणि त्यांना खूप पगार दिला जातो. यात त्यांच्या
मुलांचा सांभाळ करण्यासाठी सर्व बाबींचा विचार करून हा पगार दिला जातो.
जसे
एखाद्या शिक्षक / प्राध्यापका चे मूल लहान असेल आणि तो बाहेर गावी असेल तर
एखाद्या आया चं किंवा उत्तम पाळणा घराचा सहज वापर करता यावा ही सुद्धा
तरतूद आहे.
सरकार नुसार हे कर्मचारी सरकार चे मुलं सांभाळते, घडवते. म्हणून सरकार यांचे मूल सांभाळते. घडवायला खसखशीत रक्कम देते.
**सोबत मुलीला समान हक्क देण्यात आलेत ते कसे?
अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे , एक सरकारी कर्मचारी जेव्हा पगार उचलतो
तेव्हा त्यात सगळ्याचा वाटा असतो. ती एकट्या कर्मचार्याची पगार नसते.
या पगारीतून पैसे वाचवून मालमत्ता निर्माण केली जाते. यावर सुद्धा
सर्वांचा वाटा निर्माण होतो. कारण सरकारने ते पैसे सर्वांसाठी दिलेत. ना की
कोना एका साठी यामुळे मुलींचा आणि प्रत्येक अपत्याचा मालमत्तेवर समान
अधिकार निर्माण होतो...!!
*सरकारी कर्मचारी आई वडिलांना घरातून का नाही काढून देवू शकत?जेव्हा की तो स्वतः कमावता असतो.
समान कारण इथे सुद्धा आहे. कारण सरकारच जी पगार देतंय त्यात आई वडिलांची
सुद्धा तरतूद आणि वाटा असल्या कारणाने हे लोक आई वडिलांना काढून देवू शकत
नाही...!!
कारण मालमत्ता आणि पगार यातील एकच वाटा कर्मचार्याचा असतो. बाकी परिवाराचा...!!
**देश आणि सरकार कर्मचार्याच्या परिवारासाठी काय करतं ?
आपणास असेही पाहावयास मिळते की बर्याच घरात एक कर्मचारी आणि वडिलांना
किंवा पाल्यांना असं म्हणतांना आढळून येते की, मी तुमचा सांभाळ करतोय,
पण हे सुद्धा चूक आहे. कारण तो कर्मचारी नाही तर सरकार आणि देश त्या कर्मचार्यास आणि त्याच्या परिवारास सांभाळतय.
**
जर देशाने आणि सरकार ने पगारच दिली नाही तर ?? मग हा कर्मचारी काय
करणार..?? याचे स्वतः चे पोट भरण्याचा विचार करावा लागेल. परिवार तर दूरच,
मग परिवरातील लोकांना पण कामाला जावे लागेल...म्हणून तो कर्मचारी नाही , तर
देश आणि सरकार त्या परिवारसाठी करतंय. म्हणून या परिवाराने सुद्धा
कर्मचार्याचे नाही तर देशाचे आभारी आणि ऋणी असले पाहिजे.
**कर्मचारी आणि परिवार , देश आणि सरकार साठी काय करतं?
विशेष काहीच नाही...!! काही देश भक्त कर्मचार्याचे अपवाद वगळता औपचारिक ठरलेलं काम सोडला तर काहीच शिल्लक केल्या जात नाही...!!
मुलांना
तरतूद असते शिकण्या साठी पण हेच मुलं या पैशांचे मोबाइल घेतात, मौज मज्जा
करतांना दिसून येतात. देशासाठी काही करणं तर दूरच पन हेच मुलं देशाला आणि
सरकारला नावं ठेवतात. जे हे विसरून जातात की आपल्याला हा देश आणि सरकार
विशेष सवलती देतोय. आणि या देशाचे मजूर नागरिक आणि त्यांचे मुलं हे आपली
जबाबदारी आहेत.
*आता आपण म्हणाल जर कर्मचार्याने काम नाही केलं तरी सरकार रक्कम देईल का...??
बिलकूल
नाही देणार पण याने फक्त कर्मचार्याच्या मुलांची व्यवस्था संपुष्टात नाही
येणार तर स्वतः कर्मचार्याची ही जगायची परेशानी होईल. म्हणून कोणताच
कर्मचारी आपल्याला नोकरी सोडतांना दिसून येत नाही.
“त्यातच कर्मचारी
जो पर्यन्त सरकारी असेल तो पर्यन्त त्या कर्माच्यार्याचे परिवार आणि मुलं
जे कर्मचार्याचे नसून सरकार ची जिम्मेदारी असतात त्यांना सर्वकाही सरकार
देतं.
***आपण देशाचे ऋण कसे फेडावे..??
सर्व प्रथम आपण ऋणी असलो पाहिजे.
सोबत हे 'मी' करतोय हा चुकीचा समज सुद्धा सोडून दिला पाहीजे.
ही जाण पन ठेवली पाहिजे की, हे आपण नाही तर सरकारी पैसा करतोय. देश करतोय आपल्यासाठी, आपल्या परीवारासाठी.
सर्व कर्माच्यार्याच्या उच्च पगारी मागे हे धोरण असतं जे राजशाही काळा
पासून चालत आलय. देश आणि सरकार पेक्षा कोणी मोठं नसतं. कर्मचारी सरकारची
नोकरी करतात आणि सरकार कर्माच्यार्याच्या सोबत त्याच परिवार सांभाळतं.
सरकारच्या
याच भूमिकेमुळेच प्रत्येक सरकारी कर्मचारी आणि त्यांचे मुलं व इतर परिवार
यांनी देशाचे आणि देशाच्या सरकारचे ऋणी असले पाहिजे.
कारण सरकार आणि देश त्यांच्या साठी इतकं करतय.
त्याच बरोबर प्रत्येक तरुण युवक- युवतीची पहिली निष्ठा प्रथम प्राधान्य
तसेच त्याचे कर्तव्य हे आई वडिला साठी नाही, तर कोणत्या व्यक्ति साठी
सुद्धा नसून केवळ आणि केवळ देशासाठी आणि देशाच्या सरकार साठी असले
पाहिजे...!!
कारण...
...”प्रथम आपण भारतीय आहोत..आणि अंतिमतः सुद्धा...!!”
जय हिंद..जय संविधान...!!
- IMS. J.
Comments
Post a Comment