(zoom out for better experiance..)
"आपली लेखणी आपल्या प्रश्नांपुरती बंदिस्त करू नका. तीचे तेज खेड्या-पाड्यातील गडद अंधःकार दूर
होईल असे परावर्तीत करा."
- डॉ. बी. आर. आंबेडकर.
(M.A., Ph.D., M.Sc, D.Sc, Bar-at-law, LLD, D.Lit)
(M.A., Ph.D., M.Sc, D.Sc, Bar-at-law, LLD, D.Lit)
डॉ. बी. आर. आंबेडकर.. सिम्बॉल ऑफ नॉलेज.. कोलंबिया विद्यापीठाने world's 100 top scholars
ची लिस्ट बनवली होती.त्यात सर्वांत प्रथम नाव हे डॉ. भीमराव आंबेडकर यांचं होतं. आणि अर्थात
असणारच कारण हेच भीमराव आंबेडकर कोलंबियात शिक्षण घेत असतांना 21-21 तास अभ्यास करायचे.
लंडनमध्ये Bar-at-Law चा अभ्यास करताना ग्रंथालय सुरू होण्या आधी पाच मिनिटे ते ग्रंथालयात हजर
असत व ग्रंथालय बंद होण्याच्या वेळी सेवकाबरोबरच बाहेर पडत. दिवसभर पोटात जेवण नसले तरी त्यांचे
खिसे मात्र अभ्यासाच्या टिप्पणांनी फुगलेले असत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच ज्ञान.. अखंड ज्ञानार्जन.. आजन्म विद्यार्थी.. पुस्तक प्रेमापोटी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच ज्ञान.. अखंड ज्ञानार्जन.. आजन्म विद्यार्थी.. पुस्तक प्रेमापोटी
राजगृह बांधले.. विद्यार्जना साठीआजन्म तपश्चर्या केली..
त्यांच्या साठी शिक्षण म्हणजे अत्यंत मौल्यवान गोष्ट होती. या शिक्षणा शिवाय मनुष्याचा विकास नाही
त्यांच्या साठी शिक्षण म्हणजे अत्यंत मौल्यवान गोष्ट होती. या शिक्षणा शिवाय मनुष्याचा विकास नाही
आणि विकासाशिवाय या मनुष्य जीवनाला अर्थ नाही. त्यामुळेच ते म्हणतात की , "Cultivation of mind
should be the ultimate aim of Human Existance" मनुष्य म्हणून जर जन्माला आलो तर शिक्षणा
द्वारे स्वतःचा सर्वांगीण विकास करणे या शिवाय जीवन व्यर्थ आहे असे बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते. त्यामुळेच त्यांनी शिक्षण हे भारताच्या
कानाकोपऱ्यात पोहचवण्याचा अग्रह धरला. आणि त्यासाठी आवश्यक त्या तरतुदी केल्या.
"कोणत्याही सामाजाची उन्नती ही त्या समाजाच्या प्रगती वर अवलंबून असते.
"कोणत्याही सामाजाची उन्नती ही त्या समाजाच्या प्रगती वर अवलंबून असते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर"
कोणत्याही समाजाला जर स्वतः चा विकास घडवून आणायचा तर शिक्षणा शिवाय पर्याय नाही. आणि
कोणत्याही समाजाला जर स्वतः चा विकास घडवून आणायचा तर शिक्षणा शिवाय पर्याय नाही. आणि
याच शिक्षण पासून वंचित राहिल्या मुळेच पिढ्यानपिढ्या पासून भारतातील एक भाग स्वतःचा विकास
साध्य नाही करु शकला. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात ," ...जातीची सर्वोच्चता राखण्या करीता बुद्धिमत्तेचा
बळी दिला. ही समाज व्यवस्था एक व्होल्टेअर देखील जन्मास घालू शकली नाही..." आणि याचमुळे
भारतात आपणास सामाजिक विषमता पाहायला मिळते. एक वर्ग विकसित आणि एक वर्ग दारिद्र्यात
पहायला मिळतो. आणि या सर्वांचे कारण म्हणजे त्या खालच्या अविकसित घटका पर्यंत शिक्षण न पोहचू
देणे. त्यांच्या विकास वर निर्बंध लादणे. परिणामी तो समाज अज्ञाना च्या अंधकारात गुरफटून गेला.
"शिक्षण व विद्या याशिवाय आपला उद्धार होणार नाही. तुम्ही भरपुर वाचन केले पाहिजे . रोज एक
अर्धे पुस्तक वाचले पाहिजे."
- बाबासाहेब आंबेडकर
शिक्षणाची ही महती कळल्या मुळेच बाबाहेबांनी संपूर्ण भारतासाठी शिक्षणा चा व्यापक विचार केला.
शिक्षणाची ही महती कळल्या मुळेच बाबाहेबांनी संपूर्ण भारतासाठी शिक्षणा चा व्यापक विचार केला.
परंतु तितक्याच व्यापक प्रमाणात त्यांच्या शैक्षणिक विचारांची चर्चा होताना दिसत नाही.
"..अंगी मुरलेल्या रुढि परंपरा, चुकीच्या धारणा यांतून मुक्ती मिळवणे या शिवाय जीवनाचे दुसरे ध्येय
"..अंगी मुरलेल्या रुढि परंपरा, चुकीच्या धारणा यांतून मुक्ती मिळवणे या शिवाय जीवनाचे दुसरे ध्येय
असूच नये. आणि शिक्षण हेच मनुष्याच्या अस्तित्वाचे अंतिम ध्येय असावे..." असे बाबासाहेब म्हणतात.
कारण या शिक्षणा मुळेच समजातील विषमता नष्ट होऊन सामाजिक लोकशाही टिकून राहील आणि
यावरच राजकीय लोकशाही चे भवितव्य अवलंबून आहे. शिक्षण हाच सामाजिक, आर्थिक, राजकिय
क्रांतीचा मूलाधार आहे.
"...प्रत्येकालाच अन्ना प्रमाणेच विद्येची आवश्यकता असते...
...व्यक्ती स्वतंत्र्याची संकल्पना जर मान्य असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या ठायी आपले स्वातंत्र्य रक्षण
"...प्रत्येकालाच अन्ना प्रमाणेच विद्येची आवश्यकता असते...
...व्यक्ती स्वतंत्र्याची संकल्पना जर मान्य असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या ठायी आपले स्वातंत्र्य रक्षण
करण्याची शक्ती उत्पन्न होणे अत्यंत जरुरी आहे. व शिक्षणा शिवाय हे उत्पन्न होऊ शकत नाही..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
15 जुलै 1927 च्या आपल्या बहिष्कृत भारत मधील ...'आप घरी बाटा, बाप घरी बाटा' या अग्रलेखात
बाबासाहेब म्हणतात, "...उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस हीनबल होऊन अल्पायुषी
होतो, तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो..." याचीच प्रचिती
भारतात अनेक वर्षांपासून अनुभवायला मिळते. शिक्षण Education हा शब्द लॅटीन शब्द Educare या
शब्दाचा पासून तयार झाला आहे. Educare चा अर्थ Grow असा होतो. म्हणजेच विकास पावणे. त्या
अस्तित्वाचा सर्वांगिण विकास होणे. त्यामुळेच या देशातील प्रत्येकाने शिक्षित झालेच पाहिजे हा आग्रह
बाबासाहेबांनी धरला. बाबासाहेबांनी शिक्षणाची व्याख्या अश्या प्रकारे केली, "व्यक्तीला जाणीव देते, ते
शिक्षण." ज्या समाजाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणिव नव्हती त्या संवेदनाहीन आणि मृतवत झालेल्या
समाजात वैचारिक क्रांती द्वारे जीवन चैतन्य आणि अस्तित्वाची जाणीव निर्माण करण्याचे काम
बाबासाहेबांनी केले.आपण पाहतो आज चे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. आणि गतीने हे
बदलत आहे. आज च्या युगात प्रत्येका कडे कौशल्य आणि ज्ञान असणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना
भविष्य नाही. या दृष्टीने आपण बाबासाहेबांना अपेक्षित असलेले शिक्षण जाणून घेऊ...
बाबासाहेब विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणतात -
..विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीला चालना देवून, बौद्धिक शक्तीचे संवर्धन केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनात
बाबासाहेब विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणतात -
..विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीला चालना देवून, बौद्धिक शक्तीचे संवर्धन केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनात
खंड पडू देत काम नये...विद्यार्थी वर्गाने दोन गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. बुद्धिमत्तेत व कार्यक्षमतेत
कमी पडणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे. तसेच त्यांनी व्यक्तीगत सुखापेक्षा आपला समाज
स्वतंत्र व स्वावलंबी कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे......विद्यार्थी दशेतच तुम्ही तुमची योग्यता आणि
पात्रता वाढवा..
बाबासाहेब पालकांना उद्देशून म्हणतात -
...आई बाप मुलांना जन्म देतात, कर्म देत नाहीत हे म्हणणे ठीक नाही. आई बाप मुलांच्या आयुष्याला वळण
बाबासाहेब पालकांना उद्देशून म्हणतात -
...आई बाप मुलांना जन्म देतात, कर्म देत नाहीत हे म्हणणे ठीक नाही. आई बाप मुलांच्या आयुष्याला वळण
लावू शकतात ही गोष्ट आपल्या लोकांच्या मनावर बिंबवून जर आपण मुलाच्या शिक्षणा बरोबरच मुलीच्या
शिक्षणासाठी ही धडपड केली तर आपल्या समाजाची प्रगती झपाट्याने होईल.....शिक्षणा शिवाय माणूस
म्हणजे निव्वळ धोंडा होय. शिक्षण ही काळाची गरज आहे. वेळ आली तर उपाशी राहा , पण आपल्या
मुलांना शिकवा...
...स्त्रियांनाही ज्ञान आणि विद्येची पुरुषा एवढीच गरज आहे. म्हणून सर्वांनी आपल्या मुलींना शिक्षण दिले
...स्त्रियांनाही ज्ञान आणि विद्येची पुरुषा एवढीच गरज आहे. म्हणून सर्वांनी आपल्या मुलींना शिक्षण दिले
पाहीजे. ही फक्त पुरुषांचिच मक्तेदारी नाही. ही बाब पुर्वजांनाही माहीत होती. म्हणून आपली पूढील पिढी
जर सुधारवायची असेल तर शिक्षण हे सर्वांना दिलेच पाहिजे. तुम्ही मुलींना शिक्षण दिलेच पाहिजे...
...तुम्ही तुमच्या मुला-मुलींना शिक्षण देऊन तुम्ही जे करत आहात त्या कामात त्यांना काही कमी पडू न
...तुम्ही तुमच्या मुला-मुलींना शिक्षण देऊन तुम्ही जे करत आहात त्या कामात त्यांना काही कमी पडू न
देण्याची खबरदारी घ्या.....मुलांना शिक्षण देण्यात कसूर करू नका. आपल्या मुलांच्या बाबतीत छोटी स्वप्ने
पाहू नका, मोठी स्वप्ने पहा व त्या दृष्टीने मूलांना घडवा...
BUY POLITICS BOOK
बाबासाहेब शिक्षक आणि प्राध्यापकांना उद्देशून म्हणतात-
पीपल्स एज्युकेशन सोसायटी मध्ये शिक्षक आणि प्राध्यापक नेमतांना तो कसा असावा ? याविषयी
BUY POLITICS BOOK
बाबासाहेब शिक्षक आणि प्राध्यापकांना उद्देशून म्हणतात-
पीपल्स एज्युकेशन सोसायटी मध्ये शिक्षक आणि प्राध्यापक नेमतांना तो कसा असावा ? याविषयी
बाबासाहेब म्हणतात की, "..शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी आपल्या विषयामध्ये परिपूर्ण असावा. त्यांनी
आपली व्याख्याने मनोरंजक व अचूकपणे आणि सुबोधतेने द्यावीत. याच बरोबर त्यांनी अनेक मुद्द्यांची चर्चा करावी. यामधून विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळेल .".."..तसेच प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक प्रसार राष्ट्रीय
प्ररगतीच्या इमारतीचा पाया आहे. केवळ लोकांच्या खुशी वर हा प्रश्न सोपविण्यास प्राथमिक शिक्षणाच्या
बाबतीत सक्तीचा कायदा करावा लागतो... त्याचबरोबर विद्यापीठात दिले जाणारे शिक्षण हे समाजाभिमुख
असावे. ते विज्ञान निष्ठ आणि पक्षपात विरहित असावे. कोणत्याही विशिष्ट समाज घटकाच्या हितसापेक्ष
नसावे..." असे बाबासाहेबांचे मत होते.
शिक्षणा संबंधी बाबासाहेबांचे विचार -
..स्वार्था पलीकडे शिक्षणाने बघावे, नैतिक मूल्याची पेरणी करावी तरच त्याचा हेतू साध्य होईल..
...शिक्षणात व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याची बीजे असावीत..
..स्वाभिमान , स्वावलंबन आणि आत्मोद्धार हे परिणाम कारक शिक्षणाचे ध्येय होय..
..शिक्षणाचा उपयोग शील आणि चारित्र्याची निर्मिती करणे असा असावा..
..शिक्षणा ने उच्चत्तम नैतिकता शिकवावी. कारण ग्रंथातून मानवाच्या ठिकाणी शक्ती निर्माण होते..
आजन्म बाबासाहेबांनी भारतीय समाजोन्नतीचा मार्ग शोधण्यासाठी ज्ञानार्जन केले.. त्यामुळेच त्यांनी हे

ठाम मत मांडले, "अज्ञान आणि अज्ञानामुळे विषमता हे भारतीय दारिद्र्याचे कारण आहे. आपल्या सर्व
सामाजिक दुखण्यावर शिक्षण हेच एकमेव औषध आहे."
शिक्षणाकडे पाहण्याचा बाबासाहेबांचा दृष्टिकोन हा विधायक आणि रचनात्मक होता. बाबासाहेबांचा हा शिक्षण विषयक दृष्टिकोन
शिक्षणाकडे पाहण्याचा बाबासाहेबांचा दृष्टिकोन हा विधायक आणि रचनात्मक होता. बाबासाहेबांचा हा शिक्षण विषयक दृष्टिकोन
मांडण्याची अत्यंत आवश्यकता आहे कारण.......
" एखाद्या वनस्पतीला पाणि देण्याची जितकी गरज आहे, तितकीच एखाद्या कल्पनेला प्रसाराची
" एखाद्या वनस्पतीला पाणि देण्याची जितकी गरज आहे, तितकीच एखाद्या कल्पनेला प्रसाराची
आवश्यकता आहे. "
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(M.A., Ph.D., M.Sc, D.Sc, Bar-at-law, LLD, D.Lit)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(M.A., Ph.D., M.Sc, D.Sc, Bar-at-law, LLD, D.Lit)
Comments
Post a Comment