Dr. Babasaheb Ambedkar thoughts on "Satyagrah"

आम्हाला निधड्या छातीची व स्वाभिमानी माणसे पाहिजेत......

               Image result for babasaheb speech

     रविवार ता. ५ जुलै १९२७ रोजी मुंबई शहरातील सर्व बहिष्कृत वर्गाची जाहिरसभा महाड येथे अत्याचाराचा निषेध व त्यासंबधी पुढे काय करावयाचे हे ठरवण्याकरिता सर कावसजी जहांगीर हॉल येथे भरली होती. सभेचे अध्यक्ष स्थान डॉ. भीमराओ आंबेडकर एम.ए, पी. एच डी., डी. एससी., बार अॅट लॉं., एम. एल. सी. ह्यांनी सुशोभित केले होते. सभेला बहिष्कृत वर्गातील निरनिराळ्या जातीतील प्रमुख लोक हजर असून, ब्राम्हण- ब्रम्हणेतर पत्राचे संपादक देवराव नाईक, सो. स. लीग चे एक अस्थेवाईक वर्कर गं. नी. सहस्रबुद्धे व मद्रास कडील गीतानंद ब्रम्हचारी अशी मंडळी हजर होती. सभेत खाली लिहिल्या प्रमाणे ठराव पास झाले.
     ठराव १ - अस्पृश्य वर्गांच्या तक्रारी व त्यांच्या वर होत असलेला अन्याय यांचे सरकार कडून योग्य प्रकारे निवारण व्हावे,तसेच सरकार ने अस्पृश्यन्नोती प्रीत्यर्थ वेळोवेळी केलेले ठराव व पुढील होणारे ठराव यांची कसून अंमल बजावणी व्हावी या करिता सरकारने मद्रास विलाख्या प्रमाणे मुंबई इळख्यातही एक स्वतंत्र अधिकारी नेमावा. अशी या सभेची मागणी आहे.
     ठराव २ - बहिष्कृत हितकारिणी सभेने महाड येथे सत्याग्रह करण्याची योजना केली आहे. तिला या सभेचा पूर्णा पाठिंबा आहे. या सत्याग्रहात भाग घ्यावा अशी ही सभा बहिष्कृत वर्गातील सर्व जातींच्या लोकांना विनंती करीत आहे.
     वरील ठरवा वर मेसर्स वनमाली, मोहिते,मारवाडी मास्टर, खोलवडीकर, गोविंदाजी माधवदास, गंगावणे, गायकवाड, जाधव वगैरे गृहस्थांची भाषणे झाल्यावर अध्यक्षांनी श्रीयुत नाइक व गीतनंद ब्रम्हचारी यांना भाषणे करण्याची विनंती केली. त्या दोघांनीही आपल्या भाषणात संगितले की तुम्ही आपले मानवी हक्क प्रपता करून घेण्या करिता शक्य तितके प्रयत्न केले पाहिजेत. वरिष्ठ वर्गांचे लोक हे टन पाटिलकी करणारे आहेत. त्यांना जर तुमच्या बद्दल खरी कळकळ वाटती तर या सभेचे आमंत्रण सर्व वर्तमान पत्रातून जाहीर झाले असता वरिष्ठा वर्गांपैकी कोणीच सभेला येवू नये ही मोठी खेद कारक गोष्टा आहे. अश्या सभातून हिन्दी महासभेच्या चालकांनी अवश्य भाग घ्यावयास पाहिजे. परंतु ते जर तुमच्यात भाग घेत नाहीत तरी तुम्ही स्वस्थ बसू नका. तुम्हाला जर कोणी अस्पृश्य म्हणाला तर त्यालाही तुम्ही ज्याप्रमाणे बदकाला पाण्यात बुडवून वर खाली करतात त्या प्रमाणे तुम्ही जो कोणी अस्पृश्य म्हणेल त्यास त्याच्या दंडाला धरून पाण्यात वर खाली करून बुचकळा. ते येथ पर्यंत करा की तो मनुष्य पुन्हा तुम्हाला अस्पृश्य म्हणणार नाही. 


नंतर सभेचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांचे भाषण झाले. आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले,
                                             आपण आता दोन्ही ठराव टाळ्यांच्या गजरात पास केले आहेत. परंतु त्या पैकी दुसर्‍या ठरवा संबंधाने आपणाला पुरेशी माहिती झालेली दिसत नाही. दूसरा ठराव सत्याग्रह करण्या संबंधाचा सत्याग्रह म्हणजे लढाई. पण ही लढाई तलवार, बंदूक, तोफा,बॉम्ब घोळे या साधनांनी करवयाची नाही. तर ही लढाई शस्त्र विरहित करवयाची आहे. ज्या प्रमाणे पटूल्ला खली, वईकोम वगैरे ठिकाणी लोकांनी सत्याग्रह केला, त्याच प्रमाणे आपणाला ही महाड ला सत्याग्रह करावयाचा आहे. हा सत्याग्रह करताना कदाचित सरकार शांतता भंग होऊ नये म्हणून आपणाला कोणत्या तरी कलमा खाली पकडून तुरुंगात घालील. तर तुरुंगात जाण्या करिता तुमची तयारी पाहिजे. ज्यांना आपल्या बायका मुलांची काळजी वाहवायाची असेल अशा लोकांनी या सत्याग्रहात मुळीच भाग घेवू नये हे मी आपणास निक्षून सांगतो. आम्हाला सत्याग्रहता  जी माणसे पाहिजेत ती निधड्या छातीची व स्वाभिमानी अशी पाहिजेत. अस्पृश्यता हा आपल्या देशा वरील कलंक आहे, तो मी घालवीनच घालविन. असा ज्यांचा पक्का निर्धार झाला असेल अश्याच लोकांनी आपली नवे सत्याग्रहात नोंदवावी व अश्या निर्धाराची माणसे बहिष्कृत समाजातून निघतील अशी आपणास अशा आहे. अश्या अर्थाचे भाषण केल्यावर श्री. सीताराम नामदेव शिवतरकर यांनी सर्वांचे आभार मानले. आभार मानताना ते म्हणाले की, आज ह्या सभेला बहिष्कृत वर्गातील सर्व जातीचे लोक,तसेच गीतानंद ब्रम्हचारी, रा. नाईक व सहस्रबुद्धे हे आल्या बद्दल आम्ही त्यांचे फार आभारी आहोत. महाड प्रकारांना बद्दलची ही शेवट ची सभा आहे. या पुढे महाड प्रकरणा बद्दल सभा भरविली जाणार नाही. परंतु आज च्या सभेत पास झालेल्या ठराव प्रमाणे सत्याग्रहाची तयारी करवायची आहे. हा सत्याग्रह पावसाळा संपल्यावर आम्ही करणार आहोत. तरी अध्यक्षांनी सांगितल्या प्रमाणे ज्यांना आपले नाव सत्याग्रहात नोंदवावयाचे असेल त्यांनी दामोदर हॉल, परळ, येथे बहिष्कृत हित कारणी सभेच्या ऑफिस मध्ये नोंदवावे.



what OSHO said about Buddha and NIrvana...
findout...must listen..click here  
if u like subscribe and share...click here

Comments