आपल्या राजकीय वाटचालीच्या दरम्यान वेळो वेळी विविध प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांच्या काळजाला भिडणार्या अगणित संदेश त्या त्या वेळच्या त्यांच्या मनस्थिती नुरूप दिले होते.
महत्वाचे संदेश....Part 1
२० जुलै १९४२ रोजी नागपुर येथे ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस कॉन्फरन्स चे अध्यक्ष आणि सभासद यांनी डॉ. आंबेडकरांचा ५०व्या वाढदिवसा निमित्त सत्कार केला. भारतातील लक्षावधि पद दलितांच्या कल्यानार्थ त्यांनी जे दीर्घकाळ, सतत आणि अथक उत्साहाने प्रयत्न केले त्याची ती एक कृतज्ञता पूर्ण दखल होती. मान पत्रात असे शब्द होते. “आमची हृदये उघडून आमच्या भावनांचा अविष्कार करण्यात आमचे शब्दा तोकडे पडत आहेत.आम्ही फक्त एवढेच म्हणतो की जर या पृथ्वी वर कोणी जीवंत ईश्वर असेल च तर तो आपण आहात.” मान पत्राला उत्तर देतांना डॉ. आंबेडकर म्हणतात :
“...अश्या मान पत्राची खरोखर च काही गरज नव्हती... ’टोस्टस’ आणि मान पत्रांच्या पाठीशी एक विशिष्ट इतिहास आहे. विशेषतः‘टोस्टस’ च्या पाठीशी तर आहेच आहे. राजा च्या आरोग्य साठी मद्यपान करण्याचे समारंभ एंग्लो समाजात अंतर्गत यादवी युद्धा नंतर आणि पुनरस्थापणे च्या काळात सुरू झाले असे आपणास दिसते. मुळात त्यात सक्तीचा भाग होता, इंग्रजी सेनेच्या ज्या तुकड्यांनी राजा च्या विरोधात बंद पुकारले होते त्यांच्या वर ती गोष्टा लादली गेली होती. नव्या राजा शी त्यांनी एकनिष्ठ राहावे यासाठी राजा च्या आरोग्य साठी दारू पिण्याची सक्ती त्यांच्या वर करण्यात आली होती. आज काल राजा च्या आरोग्य साठी मद्यपणा च प्रकार सार्वत्रिक झाला आहे, पण त्याचे मूळ कोणी शोधायच्या फंदात पडत नाही. त्याचे मूळ मी आत्ताच तुम्हाला सांगितल्या प्रमाणे शंका स्पद असलेल्या निष्ठा जाहीर पणे उच्चारून बळकट करून घेण्याच्या इच्छेत होते. तुमच्या निष्ठाविषयी शंकेला जागाच नाही हे मला निश्चितपणे माहीत आहे. आणि म्हणूनच या मान पत्रा द्वारे त्या निष्ठांचे असे शपथ पूर्वक प्रकटी करण करण्याची गरज नव्हती असे मला वाटते. आता मी ते स्वीकारायलाच पाहिजे असा आग्रहच तुम्ही धरल्या मुळे तुमच्या माझ्या विषयी च्या प्रेमाचे आणि लोभाचे प्रतीक म्हणून मी त्याचा स्वीकार करतो. अस्पृश्यां साठी मी जे काही केले त्यावर तुमच्या पसंती चे प्रतीक म्हणून मी त्या कडे पाहतो. भारतातिल अस्पृश्यांच्या नावे जी भूमिका भारतीय राजकारणात मी घेतली ती तुम्हाला मान्य आहे हे या मान पत्रा वरुन सिद्ध होते. या देशाचे सरकार चालवण्यात हिंदू आणि मुस्लिम यांचे सन्माननिय सहभागीदार- सन्माननिय आणि बरोबरीच्या अटींवर सहभागीदार- म्हणून मान्यता प्राप्त करून घेणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आपण आपल्या समोर ठेवलेले हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण निरंतर प्रयत्न करू असे आश्वासन मी आपणा सर्वांना देतो.
मी या उद्दिष्टा साठी लढेन असे वचन माझ्या कडून तुम्हाला घेण्याची तेवढीशी गरज नाही. तुमच्या कडून मला वचन मिळण्याची अधिक गरज आहे. तुम्ही तुमच्या प्रेमाची आणि मजवरच्या लोभाची हमी दिली आहे.तिची फारशी आवश्यकता नव्हती. मला हमी हवी आहे ती निराळीच. आपल्या हक्कांचा आग्रह धरण्या साठी, आपल्या हक्कांसाठी लढण्या साठी आणि हक्क पदरात पाडून घेतल्या खेरीज परत न फिरण्या साठी लागणार्या सामर्थ्याची, एक जुटीची आणि निर्धाराची हमी मला पाहिजे आहे. तुम्ही तुमचे काम करण्याचे वचन द्या. माझे काम करण्याचे मी वचन देतो. न्याय आपल्या बाजूने असतांना आपण तो लढा हरण्याची शक्यताच मला दिसत नाही. लढा ही माझ्यासाठी एक आनंददायी घटना असते. पुरनार्थाने लढा ही अध्यात्मिकच गोष्ट असते. त्यात जडासक्ती किंवा क्षुद्रता असे काहीच नसते. आपला लढा हा काही संपत्ति साठी किंवा सत्ते साठी नाही. तो स्वातंत्र्या साठी लढा आहे. हिंदू सामाजिक व्यवस्थेने दडपलेले आणि ठेचून विद्रूप केलेले मानवी व्यक्तिमत्व पुन्हा प्राप्त करून घेण्याचा तो लढा आहे. या राजकीय लढ्यात जर हिंदूंची सरशी झाली आणि आपण पराभूत झालो तर ते मानवी व्यक्तिमत्व दडपणे व विद्रूप करणे या पुढेही तसे सुरू राहील. “माझे तुम्हाला उपदेशाचे निर्णायक शब्दा आहेत शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. स्वतः वर विश्वास ठेवा आणि आशा कधीच सोडू नका. मी सदैव तुमच्या सोबत राहीन,कारण मला याची खात्री आहे की तुम्ही माझ्या सोबत असाल.”
spech part 2 click here
प्रस्तुत भाषण संदर्भ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी
- नानक चन्द रत्तु
buy this book click here
Comments
Post a Comment